क्रीडा व मनोरंजन
तिला शिकू द्या, जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या……..!
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट केलं आहे. यामधून त्यांनी सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे.
आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. दिवाळीच्या शुभेच्छा देताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या, असं म्हणत त्यांनी त्यांचं नवं गाणं ट्विट केलं आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी हे गाणं ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.