राजकीय
विरोधात होते तेंव्हा हेच म्हणत होते वीज बिल माफ करा……..आता काय झाले…..?
मुंबई – वीजबिले माफ होणार नाही किंबहुना वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.शेतकरी कामगाराचे कंबरडे मोडत चालले आहे मात्र तरीही गेंडयाच्या कातडीच्या सरकारला जाग कशी येत नाही?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.
विरोधात असताना शेतकरी कामगारांचा मोठा कळवळा आला होता मग आता सत्तेत आल्यावर काय झालं?, असा सवाल खोत यांनी उर्जामंत्र्यांना विचारला आहे.तुम्ही विरोधी बाकावर बसला होता तेव्हा महापूर आणि दुष्काळाच्या काळात टाहो फोडून सांगत होतात की वीज बिलात सूट द्या किंबहुना माफी द्या आणि आता सत्तेत आल्यावर सांगता की वापरलेल्या विजेचे बील द्यावेच लागेल. तुमचं वागणं म्हणजे जनतेच्या मतांशी प्रतारणा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.