महाराष्ट्र
भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात
मुंबई – पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी आज जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
राम कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे.पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊन देखील अजून कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ ही यात्रा कदम यांनी काढली होती. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.