महाराष्ट्र
लॉक डाउन काळातील वीज बिल माफ करा अन्यथा…….! अधिकार नसतील तर घोषणा करताच कशाला……?

कोल्हापूर – एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ न करता सक्तीने वसूल करा, असं भाष्य उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूली केल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.वीजबिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे, असा सवाल राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना विचारला आहे.
नितीन राऊतांना कोणतेही अधिकार नसतील तर पोकळ घोषणा करु नका. अगोदर मुख्यमंत्र्यांना विचारुन मगच घोषणा करावी, असा सल्ला शेट्टी यांनी राऊत यांना दिला आहे.