महाराष्ट्र
हिंदुत्व हिंदुत्व नुसतं बोलायचं नसतं……. कृतीतही उतरवावे लागते………!
मुंबई – हिंदुत्वाला जे मानत नाहीत, हिंदुत्वाला जे जुमानत नाहीत, अशा शक्तीसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. हिंदुत्वाबद्दल नुसते स्टेटमेंट द्यायचे. याने हिंदुत्व होत नसतं, असा टोला विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे.
तुम्ही हिंदुत्वावर नुसते स्टेटमेंट देता. याने हिंदुत्व होत नाही, ते कृतीतही उतरवावं लागतं, असं फडणवीस म्हणाले. ते मुंबईत भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
काश्मीरमधील गुपकर आघाडीत काँग्रेस सहभागी आहे. याबाबत काँग्रेसला जाब विचारा. तुम्ही गुपकर आघाडीसोबत कसे जाता? असं त्यांना विचारा, असं आव्हान फडणवीसांनी राऊतांना दिलंय.संजय राऊत काँग्रेसला असं काही विचारणार नाहीत. कारण त्यांना फक्त सत्तेची पडली आहे, असा आरोप फडणवीसांनी राऊतांवर केला आहे.