घरातील सर्व उपकरणं 24 तास वापरली तरी इतकं बिल येणार नाही…!
मुंबई – वाढीव विजबीलाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केल्याचं फडणवीस म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकार जनतेला दिलासा देऊ शकतं. त्यासाठी ऊर्जा विभागाची स्थिती चांगली आहे. मात्र याठिकाणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा अभ्यास कमी पडतोय.”
ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देऊ असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मुळात घरातली सर्व उपकरणं 24 तास वापरली तरी देखील 5 वर्षे इतकं बिल येणार नाही तेवढं बिल 3 महिन्यांसाठी आलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
फडणवीस पुढे म्हणाले, “ऊर्जा विभागासाठी दीड ते दोन हजार कोटींचा फटका फार मोठा नाही. केंद्र सरकार यासाठी कर्ज देण्यास राजी होतं. पण, राज्य सरकारने कर्ज घेतलं नाही आणि त्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसतोय.”