देशविदेश

दिवसभरातील ठळक बातम्या…….…!

          पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटनने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून पुढील दहा वर्षांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे उद्देश समोर ठेवलं आहे. २०३० पासून देशामध्ये पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा ब्रिटनने केली आहे.
               एट्रॉसिटी कायद्याबाबात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. जातीवरुन टीका, वैयक्तिक शिवीगाळ ,जमिन व सामाजिक वादावादी यासाठी यापुढे एट्रॉसिटी टाकता येणार नाही. तसेच जाती-पातीवरुन अपमानित केल्याचे सिद्ध झाल्याशिवाय गुन्हा दाखल होणार नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.
        भारताने लसीच्या १५० कोटी डोससाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत अ‍ॅडव्हान्समध्ये केला करार.
           केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात भारतात ४५ हजार ५७६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
                 राज्यातल्या नववी ते बारावीपर्यंतची शाळा आणि महाविद्यालये  संबंधित सर्व शिक्षकांची कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचण्या मोफत असणार आहेत. याचा खर्च सरकार उचलणार आहेत.
            आता कोणत्याही राज्यात तपास करण्यापूर्वी सीबीआयला त्या राज्याची परवानगी घेणे गरजेचे राहील असे महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
               आज देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज जयंती. आयरन लेडी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इंदिरा गांधी यांची भारतीय राजकारणात एक वेगळी ओळख राहिली आहे.
          माझे बालपण इंडोनेशियात गेलेय. त्यामुळे रामायण, महाभारतातील प्रेरणादायी कथा ऐकत मी मोठा झालोय. साहजिकच हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी संस्पृतीबाबत माझ्या मनात नेहमीच आदराचे स्थान राहिलेय, असा उल्लेख आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या पुस्तकात करीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिंदुस्थानबद्दल आपल्या नेहमीच आदराचा भाव असल्याचे स्पष्ट केले आहे.

शेअर करा
Tags

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close