महाराष्ट्र

वीज बिल माफीसाठी सलून व्यावसायिकही उतरणार रस्त्यावर…..!

पुणे – दि.२० – अव्वाच्या सव्वा दिलेली वीज बिले कमी करावीत या मागणीसाठी विरोधी पक्षांनी रान उठवले आहे.विविध संघटनाही आक्रमक झाल्या असून सरकार विरोधात आंदोलन करण्याचा पावित्र्यात आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून, विविध मागण्यांसाठी व मदतीसाठी आंदोलन करून सलून व्यवसायिकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सोमवारपासून राज्यभर वीज बिलमाफी तसंच विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं नाभिक समाज नेते तथा सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी सांगितलं आहे.

उर्जामंत्र्यांच्या वक्तव्याचा सोमनाथ काशीद यांनी निषेध व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली आहे. उर्जामंत्र्यांच्या भूमिकेने सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला आहे आहे, असं काशीद म्हणाले.सोमवारपासून वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी सलून अँन्ड पार्लर असोसिएशनतर्फे आम्ही सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याचं काशीद यांनी सांगितले आहे.

सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close