महाराष्ट्र
…….मग तुम्ही सत्तेत कशासाठी बसला आहात……..?
- मुंबई दि.२० – शेतकऱ्यांचे दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, धर्माचे रक्षण करू शकत नाही, विकास करू शकत नाही मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकारने गोंधळाची परिस्थिती केली आहे. शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्ये ताळमेळ नाही. 1 जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशी मागणी आम्ही अगोदर केलेली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोरोना काळात केंद्राने जवळजवळ सर्व सुविधा दिल्या तरीही राज्य सरकार प्रत्येक गोष्टीचं खापर केंद्रावर फोडत आहे, राज्य सरकारने कोरोना काळात कसला खर्च केला?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तसेच ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं एक वर्ष वाया घालवलं आहे, त्यांच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.