महाराष्ट्र
अन्यथा 21 फुटांचा पुतळा जाळणार……..!

नागपूर | वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाची पहिली ठिणगी मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी विदर्भातून पडणार आहे. त्यावेळी विदर्भात वाढीव वीजबीलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.
मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे.