आरोग्य व शिक्षण
आ. कपिल पाटील यांचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र…….! काय आहेत मुद्दे…..?
बीड दि.२० – सोमवार पासून मुंबई वगळता राज्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश राज्यसरकारने दिल्या नंतर पालक आणि विद्यार्थी वर्गातून चिंता व्यक्त केली जात असल्याने आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय पातळीवरून सांगण्यात येत असताना व मागच्या आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत जात असताना राज्यसरकारने येत्या 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या कितपत अंमलात येतील याबद्दल पालकांना शंका आहे. शिक्षणापेक्षा बालकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे मत कित्येक पालक बोलून दाखवत आहेत. या सर्व प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले असून ऑनलाईन शिक्षण चालू ठेवून तूर्त शाळा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. आ. कपिल पाटील नेमके काय म्हणाले आहेत ते खालील पत्रात सविस्तर वाचा……