आरोग्य व शिक्षण
दुसरी लाट महागात पडेल – राजेश टोपे
बीड दि.२० – महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. राज्यात ती येऊ नये असं वाटतं पण मनात भीती आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथरेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्लीमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे
दरम्यान, कुणीही कोरोनाला गृहित धरू नये, सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.