महाराष्ट्रराजकीय
राज्यपाल योग्य निर्णय घेतील…….!
मुंबई – दि.२१ – राज्यपाल समजूतदार आहेत. विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत ते योग्य निर्णय घेतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, असं भुजबळ म्हणाले.