आरोग्य व शिक्षण
त्रिसूत्रीवर भर द्या, शाळा निर्णय प्रश्नांकित – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना कोरोनापासून वाचण्यासाठी हात धुणे, मास्क वापरणे व अंतर ठेवणे या त्रिसूत्रीवर भर दिला. तसेच शाळा सुरू करायच्या आहेत मात्र भीती आहेच असे म्हटले आहे. मात्र हे बोलताना सविस्तर अशी माहिती न दिल्याने राज्यातील शाळा 23 तारखेला सुरू होणार की नाही ? याचा उलगडा मात्र झाला नाही. तसेच शाळा उघडण्यावर प्रश्न कायम असल्याचे वक्तव्य केले. आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करत इतर देशात कोरोनाची त्सुनामी येत असल्याचे सांगत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे बोलून दाखवले.