महाराष्ट्रराजकीय
सांगितलं होतं ”ह्यांचा” नाद करू नका……..पण……!

औरंगाबाद दि.२३ -महाराष्ट्रात भाजपने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी भाजपाला सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करु नका. पण सुधारणार नाहीत, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची अंबाजोगाईमध्ये जाहीर सभा झाली यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.
सत्ता स्थापन झाल्यानंतर मला एकाने विचारलं लोकशाही काय आहे? मी म्हणालो, या देशाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही दाखवली आहे. 64 आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि 105 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला लोकशाही म्हणतात, असं धनंजय मुंडे म्हणाले.
पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है, असं म्हणत मुंडेंनी भाजपवर निशाणा साधलाय.