महाराष्ट्र

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र ईडी च्या ताब्यात…….!

मुंबई दि.२४ – शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने छापा टाकलाय. याशिवाय त्यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक आणि विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. तर ईडीने आता विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे.

विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालंय. विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.प्रताप सरनाईक यांच्या घरासोबत त्यांच्या कार्यालयामध्ये देखील ईडीने धाड टाकली. यामध्ये ईडीकडून मुंबई तसंच ठाणे परिसरातील 10 ठिकाणी शोधमोहीम सुरु केली.

ईडीच्या पथकाकडून सकाळी 8 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सध्या प्रताप सरनाईक देशाबाहेर गेले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close