आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
बीड जिल्ह्यात आजपर्यंत 65 शिक्षक कोरोना बाधित, केज तालुक्यातील सहा शिक्षकांचा समावेश…..!
बीड दि.25 – बुधवार दि. 24 पर्यंत जिल्ह्यातील 6296 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून प्राप्त अहवालात 65 शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये केज तालुक्यातील 6 शिक्षकांचा समावेश आहे. 843 अहवाल प्रलंबित आहेत.
दरम्यान केज तालुक्यातील 685 शिक्षकांपैकी 529 शिक्षकांची तपासणी झाली असून 376 शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 6 शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 76 अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्याती उर्वरीत 156 शिक्षकांची तपासणी करण्यात येणार आहे. दि.26 पर्यंत वेळापत्रकातील शिक्षकांची तपासणी पूर्ण होणार असून ज्यांची नावे यादीत आलेले नाहीत अश्या उर्वरित शिक्षकांची तपासणी 27 तारखेला करण्यात येणार आहे. कांही कारणास्तव ज्यांची तपासणी झालेली नाही अश्या शिक्षकांनी 27 तारखेला आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली.