राजकीय

तर गरज पडल्यास राज्यभर मोर्चे काढू ……..!

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा इशारा

नागपूर दि.२६ – ओबीसींच्या मुद्द्यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा आक्रमक झालेत. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू अशा इशारा दिला आहे.

          विजय वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा. एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. त्याचसोबत ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे”

मेगा भरती नंतर करा, ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, असंही ते म्हणालेत.मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही. त्याचप्रमाणे जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना तिथे मत मागताना लाज वाटत नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close