महाराष्ट्र
नव्या नवरीच्या बांगड्या वर्षभर वाजतच असतात……मात्र……!

पुणे दि.२७ – नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण लक्षात ठेवा, तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
पुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारा निमित्त एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे.
कोव्हिड काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हा माझा भाऊ गावागावात माहीत झाला. कोव्हिड काळात पीपीई किट घालून मालेगावला भेट देणारा हा पहिलाच मंत्री आहे, असे गौरवोद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.