महाराष्ट्रराजकीय
आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही………!
मुंबई दि.27 – राजकीय कलगीतुरा थांबण्याचे संकेत दिसत नाहीत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते एकमेकांना अस्मान दाखवण्याचे इशारे देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुमच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला होता. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मोदी साहेबांना आणि अमित शाहांना धमक्या देऊ नका, आम्ही येथे समर्थ आहोत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
आम्हाला नका सांगू हात धुवून मागे लागू. कोण कोणाच्या मागे लागेल हे लवकरच कळेल. माझ्याकडे शंभर टक्के कुंडल्या आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा सर्वांची पळता भुई थोडी होईल. असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर केवळ मंत्रिपदांसाठी शिवसेनेसोबत गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.