क्राइम

एटीएम मशीन पळवले, 28 लाखांवर डल्ला…….!

एटीएम मशीन पळवले, 28 लाखांवर डल्ला…….!

जालना दि.२८ – २८ लाखां पेक्षा जास्त रक्ष्क्कमम असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याची  घटना जालन्यातील औद्योगिक वसाहतीत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

       जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेला लागूनच बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये आज (शनिवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी सेंटरमधील एटीएम मशीनच पळवले. या मशीनमध्ये २८ लाख ६७ हजार ६०० रुपये होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे. चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये एटीएम टाकून नेताना दिसत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एटीएममधील रोकड आणि ४ लाख रुपये किंमतीचे मशीन असा ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून चंदनझिरा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पोलीस दलातही या घटनेने खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close