महाराष्ट्र
काय करतात मंत्रालयातील झारीतले शुक्राचार्य……..? उद्या केज येथे महत्वपूर्ण बैठक…..!
पुणे दि.28 – मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप झाले आहेत त्यामुळे अनेक अडचणी येतात, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर त्यासाठी लढावंच लागेल, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त छगन भुजबळ भिडेवाड्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरक्षणाच्या दुसऱ्या कायद्याला भुजबळांनी पाठिंबा दिला. तसेच आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात जाणं हे काही नवीन नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.
मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिलं पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, कधी नव्हता. मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं भुजबळ म्हणाले.