क्रीडा व मनोरंजन
ऐकावं ते नवलच…… एका बकऱ्याची किंमत दिड कोटी………!
सांगली दि.३० – बकरी ईदच्या निमित्त कुर्बानी देण्यासाठी कपाळावर चांद ची प्रतिकृती असलेल्या बकऱ्यांना लाखो रुपये किंमत येत हे ऐकून होते. मात्र सांगलीतील आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त रविवारी आयोजित जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला. या बाजारात मेंढ्या व इतर जनावरांसोबत तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला बकरा विक्रीसाठी दाखल झाला होता.
सांगली तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांनी दीड कोटींचा मोदी बकरा बाजारात विकण्यासाठी आणला होता. या बकऱ्याला बाजारात 70 लाखापर्यंत मागणी झाली. मेटकरी यांना दीड कोटी रुपये मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती किंमत न मिळाल्याने शेवटी त्यांनी बकरा विकणार नसल्याचा निर्णय घेतला.
कोरोनामुळे आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती, त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येणार आला.