आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

……..तर लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल – राजेश टोपे

 बीड दि.30 – देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे तब्बल ३८,७७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.याशिवाय देशात गेल्या २४  तासात ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात ४ लाख ४६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत वाढ झाली तर त्यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जाईल असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
                  जळगाव शहरातील एमआयडीसी येथे मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणी घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापासत्र टाकल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून एमआयडीसीतील बीएचआरच्या मुख्य कार्यालयात तांत्रिक माहितीसह कागदपत्रांची चौकशी सुरु होती. ट्रकभर पुरावे घेवून तब्बल तीन दिवसांच्या चौकशीनंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे 135 जणांचे पथक रविवारी दुपारी पुण्याला माघारी परतले आहे.
             एक महिन्यापासून कोरोना संक्रमणाशी झुंज देत असलेल्या राजसमंदचे आमदार किरण माहेश्वरी यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.आमदार किरण यांच्यावर गुडगावच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांचं उपचारादरम्यान राजस्थानमधील गुडगाव इथल्या रुग्णालयात निधन झालं आहे.
            सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं न्याय मिळावा म्हणून राज्यपालांकडे धाव घेतली आहे. नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपुढे मांडली आहे. 2014 पासून वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी, म्हणून कविता राऊतनं अर्ज केला होता.
           चीनने लवकरच तिबेटमधून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर म्हणजेच यारलुंग जांगबो नदीवर भारतीय सिमेजवळ मोठं धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठं धरण असणाऱ्या थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे समार्थ्य चीनला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
                  गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ने पर्यटकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. यामुळे, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असलेलं केवडिया हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचं फॅमिली हॉलिडे डेस्टिनेशन बनत चालले आहे”, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
                      नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरमने पुन्हा एकदा मोठं हत्याकांड घडवून आणलं आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार बोको हरम या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेने शेतात काम करणाऱ्या ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने केलेल्या या हल्ल्यामध्ये सर्व पुरुषांची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यानंतर या दहशतवाद्यांनी काही महिलांना पळवून नेलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close