क्राइम

संतप्त प्रेयसीने टाकले नववधूच्या डोळ्यात फेविक्विक…….अन केसही कापले…….!

सध्या प्रेमात धोका वाढण्याची प्रकरण वाढत चालली आहेत. अशातच बिहारमध्ये प्रियकराने प्रेमात विश्वासघात करत दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. मात्र त्यानंतर संतप्त प्रेयसीने जे काही केलं ते अजबच आहे.

बिहारमधील गोपाल राम असं प्रियकराचं नाव आहे. गोपालने दुसऱ्या मुलीश लग्न केलं. त्यामुळे नाराज झालेली प्रेयसी खुपच चिडली होती. प्रेयसी ही गोपालच्या बहिणीची मैत्रिण होती. 1 डिसेंबरला गोपालचं लग्न झालं आणि तो पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत मोरा तलाव गावात आपल्या घरी आला.गोपालच्या बहिणीची मैत्रिण म्हणून प्रेयसी घरात आली. घरातले सदस्य झोपले असताना तिने थेट नववधूच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तिने नववधूचे केस कापले आणि तिच्या डोळ्यात फेविक्वीक ओतलं. नववधूने आरडाओरडा केला, तिला वेदना सहन न झाल्याने ती तडफडू लागली. आरडाओरडा केल्याने प्रेयसी पळ काढण्याच प्रयत्नात असताना घरातल्यांनी तिला पकडलं आणि घरात बांधून ठेवून मारहाण केली.

दरम्यान,  यामध्ये नववधू गंभीर जखमी झाली असून तिची नजर जाण्याची शक्यता आहे. बिहारच्या शरीफ येथील सदर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close