क्राइम
अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पिडीतेसह घेतला शोध…….! बीड पोलिसांची कारवाई…….!
बीड दि.४ – पोलीस ठाणे चकलंबा, जिल्हा बीड येथे दिनांक 16/03/2019 रोजी गुरनं 47/2019 कलम – 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी व पिडीतेचा शोध न लागल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा दिनांक 01/03/2020 रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष बीड यांचे कडे पुढील तपास कामी वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अपहरित मुलीचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी मा.पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने कक्षाचे पथकाकडुन सदर गुन्हयातील आरोपी व पिडीत यांचा शोध घेण्यासाठी कसोशिने प्रयत्न करण्यात येत होते.
दरम्यान दिनांक 03/11/2020 रोजी सदर गुन्हयातील आरोपी व पीडीत मुलगी हे मापेगाव, परतुर जि. जालना येथे आहेत. म्हणुन दिनांक 04/11/2020 रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पथकातील कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावून सदर गुन्हयातील आरोपी व पीडीत मुलगी यांना मापेगाव, परतुर जि. जालना येथुन ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता काल पोलीस ठाणे चकलंबा यांचे ताब्यात दिले.
मागील आठ दिवसात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, बीड पथकाने अपहरणाचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये पोलीस स्टेशन हसनाबाद 143/2019 कलम 363 भादवि गुन्हा कक्षास दिनांक 11/09/2020 रोजी प्राप्त झाला होता तो ही यातील आरोपी व पिडीत मुलीचा करमाळा जि. औरंगाबाद येथे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणला.
पोलीस स्टेशन नळदुर्ग गु.र.नं. 86/2018 कलम 363 भादवि हा गुन्हा तपासकामी कक्षास दिनांक 30/03/2019 रोजी प्राप्त झाला होता. त्याचा अंदुर जि. उस्मानाबाद येथे जावुन शोध घेतला ती मिळुन आल्याने पो.स्टे.नळदुर्ग येथे हजर केले.
पोलीस स्टेशन गंगापुर गु.र.नं 75/2019 कलम 363 भादवि हा गुन्हा तपासकामी 13/10/2020 कक्षास प्राप्त झाला होता. त्याअन्वये सदर गुन्हयातील अपहरीत बालकाचा गंगापुर जि. औरंगाबाद येथे जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टेशन गंगापुर जि. औरंगाबाद येथे हजर केले.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पथकाने केली आहे.