आरोग्य व शिक्षण
का बदलणार बाटलीबंद पाण्याची चव……..?
नवी दिल्ली दि.४ – आता बाटलीबंद पाण्याची चव तुम्हाला वेगळी लागण्याची शक्यता आहे. कारण यापुढे बाटलीत बंद असलेल्या पाण्याची चव बदलणार आहे. हे असं का होणार आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.तर अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने पाण्याच्या बाटल्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वामुळे पॅकेज्ड पाणी तयार करण्याची पद्धत बदलणार आहे.
नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक लीटर पाण्याच्या बाटलीत 20 मिलीग्रॅम कॅल्शियम तसंच 10 मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकत्र करावं लागणार आहे. मिनरल्स हे चवीसाठी चांगले मानले जातात. मात्र फिल्टरच्या प्रकियेत ते काढले जातात. परंतु ग्राहकांच्या फायद्यासाठी ते पुन्हा टाकण्यात येणार आहेत.
हा आदेश लागू करण्यासाठी कंपन्यांना दोनदा वेळ देण्यात आला होता. मात्र, आता हा आदेश लागू करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2020ची तारिख निश्चित केली आहे. त्यामुळे आता हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होईल.