राजकीयशेती

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील ”हा” नेता चक्क मोटारसायकल वर दिल्लीकडे रवाना…….!

बीड दि.५ – चळवळ आणि संघर्ष ह्याच बळावर सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना झालेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.

महाराष्ट्रातही प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close