आरोग्य व शिक्षण
कोरोनाची लस घेतलेले मंत्री कोरोना बाधित…….!
अंबाला दि.५ – हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्य म्हणजे अनिल वीज हे कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक बनले होते. अनिल वीज यांनी ट्विट केलं असून ते म्हणाले, “मला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अंबाला इथल्या सिव्हील रुग्णालयात सध्या मी उपचार घेतोय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.”
20 नोव्हेंबर रोजी कोरोनावरील ‘कोवॅक्सीन’ या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. त्यावेळी अनिल विज यांनी स्वत:हून पुढाकार घेत कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता.
अनिल वीज यांच्यासोबत 200 जणांना या लसीचा डोस देण्यात आला होता. पुढील डोस 28 दिवसांनंतर देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे.