क्राइम
एकाच खोलीत दोन अल्पवयीन मुलांचे आढळले मृतदेह……..!

बुलडाणा दि.५ – शहरातील चिखली रोडवरील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृहात पहाटेच्या सुमारास दोन मुलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
मंगेश लक्ष्मण डाबेराव (वय १५), गजानन शंकर पांगरे (वय १७ ) अशी त्या मयत मुलांची नावे आहेत. दरम्यान मृतदेह आढळलेल्या खोलीत ३ मुले होती. एक जण सुखरूप असून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे. पोलीस तपासात घटना नेमकी काय आहे ? हे स्पष्ट होईल.