आरोग्य व शिक्षण
कोरोना लसीसाठी जास्त काळ वाट पहावी लागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य……….!
मात्र निष्काळजीपणा नको.......!

नवी दिल्ली दि.7 – कोरोना लसी साठी देशाला आता जास्त काळ वाट पाहण्याची गरज नसल्याचे मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी केलं आहे, ते आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
दरम्यान लस जरी येणार असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन करताना दुर्लक्ष करु नका, असं आवाहनही मोदींनी केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लसीकडे लागलं आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबण्याची आवश्यकता नाही, असं मोदी म्हणाले.
तसेच लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं स्पष्ट केले आहे.