राजकीय
केज तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर……!
केज दि.7 – आरक्षण सोडतीची प्रतीक्षा संपली असून सोमवारी केज तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचे आरक्षण अखेर आज जाहीर झाले आहे. यामध्ये अनेकांना अपेक्षित तर अनेकांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे.
केज तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, सभापती परिमळा विष्णू घुले, सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल धस यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोडतीमध्ये खालीलप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

