क्राइम
कोयत्याने केक कापणे पडले महागात….कापणारा गेला पळून मित्र लागला पोलिसांच्या हाती……..!
पुणे दि.८ – दापोडी येथे तरुणांनी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र ज्याने केक कापला तो फरार झाला असून मित्रच पोलिसांच्या हाती लागला आहे.
भोसरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. तर त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. समीर सियाज बागसिराज आणि सोहेल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी समीर याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.