देशविदेश
डी डी बनसोडे
December 9, 2020
SBI बँकेत 8500 जागांसाठी अप्रेंटीस पदासाठी भरती…….! ”या” तारखेपर्यंत करा अर्ज……!

बीड 9 – देशाची सर्वात मोठी सार्वजिक बँक एसबीआयला भविष्यात १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी एसबीआयने पहिल्या टप्प्यात निम्म्या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीचा १० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांना लगेचच तयारी करून अर्ज भरावा लागणार आहे.
स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.