आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन
नेमकी काय आहे फिट इंडिया मूव्हमेंट……?
केंद्र शासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
बीड दि. 9 – केंद्र शासन क्रीडा विभागा मार्फत “फिट इंडिया मूव्हमेंट” अंतर्गत फिट इंडिया कॅम्पेन डिसेंबर 2020 राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 2019 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “फिट इंडिया मुव्हमेंट” या योजनेची घोषणा केली आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी अरविंद विद्यागर,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक बीड यांनी केले आहे.
या योजनेमध्ये देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांची फिटनेस असेसमेंट टेस्ट घेण्याचे निर्देशित करण्यात आले असून केंद्र शासनाने डिसेंबर महिन्यामध्ये फिट इंडिया कॅम्पेन 2020 हा उपक्रम जाहिर केला आहे. हा उपक्रम संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये बीड जिल्हयात पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये फिट इंडिया स्कुल वीक,प्रभात फेरी, सायक्लथोन्स, फिट इंडिया ॲपव्दारे असेसमेंट आणि फिट इंडिया क्किज,प्रश्न मंजुषा असे उपक्रम होणार आहेत.
शालेय शिक्षण व क्रिडा विभागाव्दारे प्रसुत शासन निर्णय क्र. संकिर्ण 2020 प्र.क्र.140/ एसडी- 6 दि. 10 नोव्हेबंर 2020 नुसार इयत्ता 9 ते 12 वी चे वर्ग 23 नोव्हेबर 2020 पासून सुरु करण्यास तसेच आश्रमशाळा, वसतीगृह मार्गदर्शक सूचना देऊन सुरु करण्यात येणार आहेत या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यायम करुन तंदुरुस्ती, सुदृढता अंगी आनण्याच्या प्रक्रीयेमध्ये सहकार्य करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होणार आहे.
दरम्यान सद्यस्थितीत असलेल्या प्रशालेच्या वेळापत्रकानुसार दररोज अर्धा तास व्यायाम व खेळांकरिता विशेष राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या उपक्रमाचे बीड जिल्ह्यात आयोजन करताना माहे डिसेंबर या महिन्याचा कालावधी लक्षात घेता सायक्लोथॉन, प्रभात फेरी या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना देखील समाविष्ट करुन घेऊन दैनंदिन किमान 30 मिनिटे व्यायमाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.
उपक्रमाचे आयोजन करताना कोव्हीड- 19 साथीच्या रोगा संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाव्दारे निर्गमित सूचनांचे तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करावे. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी फिट इंडिया मूहव्हमेंट कार्यक्रमा अंतर्गत फिट इंडिया कॅम्पेन डिसेंबर 2020 या कार्यक्रमास आपल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मोठया प्रमाणात आयोजन करावे.