आरोग्य व शिक्षणदेशविदेश
कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करता येणार नाही………! रशियन आरोग्य अधिकाऱ्याचा इशारा……!
कोरोनाने सर्व जगभरात धुमाकूळ घातलाय. सध्या कोरोनावर लस शोधण्यासंदर्भात जगभरातील १०० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. दरम्यान लवकरच रशियाची स्पुटनिक व्ही लस येणार आहे.
मात्र कोविड-19 प्रतिबंधित रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्यापूर्वीच रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीसंदर्भात नागरिकांना इशारा दिलाय. स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना मद्यपान करता येणार नाही.रशियाच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन आरोग्य अधिकाऱ्यांकडून स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना जवळपास 2 महिने मद्यपान करता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे.
रशियाच्या उप-पंतप्रधान टाटियाना गोलिकोवा यांनी कोरोनाच्या या लसीसंदर्भातील सूचना तसंच नियमांची घोषणा देखील केलीये. “मास्क- सॅनिटायझर वापरणं, किमान लोकांना भेटणं तसंच मद्य सेवन टाळणं या गोष्टी लस घेतल्यानंतर पाळाव्या लागणार असल्याचं,” त्या म्हणाल्या आहेत.