आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
राज्यातील 36 जिल्ह्यात एकाचवेळी दिली जाणार लस…..! पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना मिळणार संधी……!
बीड दि.११ – राज्याला दिलासा देणारी बातमी आली असून कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित झाले आहेत. एकाच वेळी राज्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये लस देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान केलं यावेळी ते बोलत होते.
यावेळी पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.
दरम्यान पहिल्या टप्प्यात 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. यादी तयार करून मतदान केंद्राप्रमाणे लस दिली जाईल. लस दिल्यानंतर 30 मिनिटे तिथे बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस नवी मुंबईतील वाशी केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केलं जाणार आहे. लसीकरणासाठी 16 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
तर 16 हजार 245 कर्मचाऱ्यांची लस टोचण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.