आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
सरकारी कार्यालयात आता जीन्स आणि टी शर्ट वर दिसणार नाहीत अधिकारी, कर्मचारी……!आठवड्यातून एकदा घालावा लागणार खादीचा ड्रेस…….!
बीड दि.12 – महाराष्ट्र सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असून यापुढे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार होणार आहे.
दरम्यान सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे ? कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहेत. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही.
तर महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असे देखील निर्देश देण्यात आले आहेत.