क्राइम
पोटच्या दोन मुलांची हत्या करून महिलेने स्वतः ही केली आत्महत्या

बीड दि.१६ – डोक्यात एखादी गोष्ट बसली की कांही लोक काय करतील हे सांगता येत नाही. असाच कांहीसा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं नवरी सारखा श्रृंगार करुन आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या करुन, स्वत: आत्महत्या केली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर महिला अंगणवाडीत सहाय्यक म्हणून काम करतं होती. या महिलेनी आपल्या 6 आणि 3 वर्षांच्या मुलांना गळफास देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या करुन स्वत:ला संपवलं.
पोलिसांच्या तपासादरम्यान उघड झालेल्या प्रकारात, दोन महिन्यांपूर्वी मृत महिलेची प्रस्तुती झाली होती. परंतू जन्माला आलेल्या बाळाचा दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मृत महिलेनी या घटनेचा मोठा धस्का घेतला होता.
दरम्यान, त्या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या आत्महत्येमागचं नेमक कारण स्पष्ट झालं नसून, पोलिस त्याचा तपास करत आहेत.