क्राइम
राज्य सरकार मधील “या” नेत्याच्या नावाने जादूटोणा………..! दोघे पोलिसांच्या ताब्यात……!

मुंबई दि.१७ – ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केला गेल्याची माहिती समोर आली आहे. जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावलीमध्ये हा सर्व प्रकार चालू होता. एका घरात तांदळात एकनाथ शिंदेंचा फोटो ठेवत अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांच्या जिवाल धोका किंवा त्यांना शरीराला जीवघेण्या जखमा होण्यासाठी या अघोरी प्रथेचा वापर केला गेला असल्याचे समजते.
शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आहे. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी असं अटक केली असून पोलीस या मागचा खरा सुत्रधार कोण ? याचा तपास करत आहेत.