
बीड दि.19 – ग्रामविकासाच्या माध्यमातून आदर्शगाव म्हणून राळेगणसिद्धी या गावची निवडणूक बिनविरोध होत असते. गेल्यावेळी राळेगणसिद्धीमध्ये निवडणुक झाली होती. यावेळी मात्र पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून सहमती घडून येते.
ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि आमदार निधीतून 25 लाख रूपये मिळवा, ही योजना आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे.नीलेश लंके यांच्या या योजनेचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनीही कौतुक केलं आहे. आमदार लंके यांच्या योजनेला प्रतिसाद देणार हे राळेगणसिद्धी पहिलं गाव ठरलं आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी ग्रामविकासाचे काम आपल्या या गावापासून सुरू केले. गावात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बहुतांश वेळा निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र मागील वर्षी निवडणुका झाल्या होत्या.