क्राइम
केज तालुक्यात महिलेचा विनयभंग
केज दि.१९ – शेतात गेलेल्या म्हशी बाहेर काढ असे म्हटल्यावरून एका महिलेस मारहाण करत विनयभंग केल्या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तालुक्यातील सासुरा येथे दि. १९ रोजी दुपारी १२ वा. एक महिला चाफा नावाच्या शेतामध्ये जनावरे बांधीत असताना सुहास वसंत उगले (रा.सासुरा) याच्या म्हशी फिर्यादीच्या शेतात गेल्या होत्या. दरम्यान त्यास म्हसी बाहेर काढण्यास सांगीतले असता आरोपीने म्हसी बाहेर काढणार नाही असे म्हणुन शिवीगाळ केली व सदरील महिले जवळ येवुन तिस चापटा बुक्क्याने मारहाण करत विनयभंग केला. तसेच कोणाला सांगीतले तर जिवे मारण्याची धमकीही दिली. सदरील महिलेच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. मुकुंद ढाकणे हे करत आहेत.