हवामान
पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात वाढणार गारठा, परभणीचा पारा 7 अंशावर.…..…!
बीड दि.२० – राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात फारशी थंडी जाणावली नाही. पण आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.
मागील आठवड्यात दूर गेलेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या 24 तासात तापमानात 1.2 अंश सेल्सिअसनं कमी झालं आहे. अशात आता पुढचे काही दिवस थंडी आणखी वाढेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान मराठवाड्यात ही पुढच्या आठवड्यात गारठा वाढणार असून त्याची सुरुवात झाल्याचे परभणीत दिसून येत असून परभणीचा पारा घसरला असून तिथे तापमान कमी होऊन 7 अंशावर गेले आहे.