का झालाय 9420408404 हा नंबर सोशेल मिडियावर व्हायरल….…? नेमका आहे कुणाचा…….?
सोशल मीडियावर कालपासून 9420408404 हा मोबाईल नंबर व्हायरल होतोय. हा मोबाईल नंबर कोणाचा आहे, सोशल मीडियावर अचानक का व्हायरल करण्यात आला ? असा प्रश्न अनेक नेटीझन्सना पडला आहे.
तर हा दहा आकडा नंबर चेष्टा मस्करी म्हणून किंवा कोणाची फिरकी घेण्यासाठी व्हायरल करण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरल होणारा आकडा मोबाईल नंबर म्हणून व्हायरल होत असला, तरी मुळात या दहा आकड्यांची निर्मिती ही टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या डावात टीम इंडियाची 9 बाद 36 अशी स्थिती झाली. टीम इंडियाच्या निच्चांकी धावसंख्येमुळे ट्विटरवर #36AllOut हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.
दरम्यान दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात मयंक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. यामुळे प्रत्येकी फंलदाजाची आकडेवारी ही एकेरी होती. त्यामुळे सोशल मीडियावर टीम इंडियावर उपरोधिक टीकेच्या हेतूने 9420408404 हा आकडा मोबाईल नंबर व्हायरल करण्यात आला.
या धाव संख्येतून झाली झाली नंबर ची निर्मिती……!
मयंक अग्रवाल -9, पृथ्वी शॉ-4, जसप्रीत बुमराह-2, चेतेश्वर पुजारा-0, विराट कोहली-4, अजिंक्य रहाणे-0, हनुमा विहारी-8, रिद्धीमान साहा-4, रवीचंद्रन आश्विन-0 आणि उमेश यादव-4*