क्राइम
तिर्रट खेळणाऱ्यांवर बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , १,४०,४३० रुपयांचा मुद्येमाल जप्त
बीड दि.२१ – पोलीस अधीक्षक, बीड यांचे आदेशावरुन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध धंदे करणा-यावर मोठी कारवाई केली असून सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रविवार पेठ येथे शिवलींग वसंतराव क्षिरसागर रा,तेलीगल्ली, बीड हा स्वत:चे फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या काही इसमांना एकत्र बसवून त्याचे मालकीचे खोलीमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे. सदरील माहितीवरून शिवलींग वसंतराव क्षिरसागर रा.रविवार पेट, बीड, गणेश लक्ष्मण गायकवाड रा.गजानननगर, बीड, गजेंद्र रामभाऊ रा.शुक्रवार पेठ, बीड, राजेंद्र सयाजी इनकर रा.संघर्षनगर, बीड, दत्ता रामभाऊ वनवे रा.धनगरपुरा, बीड, शफीक अब्दुल रशोर कुरेशी रा.मोमीनपूरा, महेश प्रल्हाद जोशी रा.विप्रनगर, बीड, पवन बंडूप्रसाद शर्मा रा.विप्रनगर, बीड, विष्णु छगनराव कानगावकर रा.तेलीगल्ली, बीड, सुनिल भगवान बोचरे, रा.गजानननगर, बीड, सयाजी मसाजी निर्मळ रा.धनगरपूरा, बीड, हनुमंत मसाजी वाघमारे, रा.खासवाग, बीड यांना जागीच पकडून त्यांचेकडून रोख रक्कम व तिर्रट नावाचे जुगाराचे साहित्य असा एकूण 1,40,430/- रु.चा मुद्येमाल मिळून आल्याने त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन, पेठ बीड येथे गु.र.नं. 324/2020 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पेठ बीड पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.