शेती

कापूस नोंद करण्याची मुदत वाढवली……!

बीड दि.२२ –  जिल्ह्यात कापूस खरेदी हंगाम सन २०२०-२१ मध्ये शासकीय हमीभावानुसार कापूस खरेदी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांचे मार्फत चालू आहे. बीड तालुक्यामध्ये सीसीआयची ११ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर, गेवराई येथील ७ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर व वडवणी येथील २ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू आहे. या तीन तालुक्यात दि. २१ डिसेंबर, २०२० अखेर एकूण २,४३,५९४ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत माजलगाव तालुक्यात ४ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर, परळी तालुक्यात १ जिनिंगवर, केज तालुक्यात ४, धारुर तालुक्यात ६ अशी एकूण १५ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू असून दि. २१ डिसेंबर, २०२० अखेर या चार तालुक्यात एकूण २,६४,०७१ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांकडून १,४२.१७७ क्विटल कापूस खरेदी झालेली असून जिल्ह्यामध्ये सीसीआय, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व खाजगी खरेदी अशी एकूण ६,४९.८४२ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची परळी तालुक्यात ४, माजलगाव तालुक्यात ५, केज तालुक्यात १ व आष्टी तालुक्यात १ अशा एकूण ११ कापूस खरेदी केंद्राना नव्याने मंजुरी मिळालेली आहे. सदर नव्याने सुरू होणार्या ११ कापूस खरेदी केंद्रांवर मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे दि. २१ डिसेंबर, २०२० रोजीचे आदेशान्वये १६ ग्रेडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये दि. १९ डिसेंबर, २०२० अखेर ६६७४६ शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस शासकीय हमीभावानुसार विक्री करण्यासाठी संबंधित बाजार समित्यांकडे आवश्यक कागदपत्रासह नोंदणी केली आहे; परंतु जिल्ह्यातील बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व लोकप्रतिनिधींकडून कापूस नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. सबब जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतक-यांना त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद करण्याची मुदत दि. ०४ जानेवारी, २०२१ अखेर वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या वाढीव कालावधीत त्यांचेकडील विक्रीयोग्य कापसाची आपल्या तालुक्याचे बाजार समितीमध्ये आवश्यक त्या कागदपत्रासह नोंद करावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद बाजार समितीकडे केलेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी दि. ०४ जानेवारी २०२१ पर्यत त्यांचा पासपोर्ट साईझचा फोटो, आधार कार्ड, जनधन खाते वगळून इतर राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत, कापूस पिकाची नोंद असलेल्या गाव नमुना क्र. ७/१२ ची प्रत आणि तलाठी यांचे स्वाक्षरी व शिक्क्यासह कापूस पीक पेरा प्रमाणपत्र यासह आपल्या बाजार समितीकडे नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक बीड प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close