अवघ्या कांही तासात 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 18 हजार कोटी रुपये जमा…..!

नवी दिल्ली दि.२५ – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याद्वारे 2 हजार रुपये आज 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यात येत्या काही तासांतच वर्ग करणार आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी 2000 रुपयांच्या स्वरूपात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट जमा केले जातात. आपण या योजनेचे लाभार्थी असल्यास आपण घरी बसून खात्यातील रक्कम आली की नाही तपासू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम वर्ग केली जाते. पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणं आवश्यक आहे.
दरम्यान अद्याप जे शेतकरी या योजनेत नसतील तर आताही नोंद करून आपण लाभार्थी होऊ शकता. यासाठी ऑनलाइन पद्धतीने आपली माहिती भरणे आवश्यक आहे.