क्राइम
केज तालुक्यातील होळ येथील महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र हिसकावले
अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल

केज दि.२५ – शेतात महिला ही एकटीच खुरपणी करीत असल्याची संधी साधून गावातील एका अल्पवयीन मुलाने या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना केज तालुक्यातील होळ येथे घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
होळ येथील शितल दयानंद शिंदे ( वय २९ ) ही महिला २३ डिसेंबर रोजी गावालगतच्या ‘गावकर’ नावाच्या शेतात खुरपणी करीत होती. ती एकटीच आणि खुरपणी करण्यात व्यग्र असल्याची संधी साधून गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने या महिलेच्या पाठीमागून अचानक आला. त्याने शितल शिंदे यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेत तेथून पोबारा केला. शितल शिंदे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार सिमाली कोळी ह्या पुढील तपास करीत आहेत.