महाराष्ट्र

राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांचीही होणार ईडीकडून चौकशी…….?

मुंबई दि.26 – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नाही. नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असं एकनाथ खडसे म्हणाले.”

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशारा  एकनाथ खडसेंनी दिला होता.ईडीने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलवल्याचं कळतंय. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close