#Corona

महाराष्ट्रात नवीन प्रजातीच्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही…….!

औरंगाबाद दि.30 – गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात कुठेही नवीन विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

युरोप खंडातील बहुतांश देश तिसऱ्या लॉकडाऊनवर गेले आहेत. तेथे कठोर लॉकडाऊन केले जात आहे. आपण त्या स्टेजवर जाऊ नये, असे राज्यातील जनतेला वाटत असेल तर स्वयंशिस्त पाळावी लागेल, आरोग्य यंत्रणेला काम करायला एक मर्यादा राहील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.पुण्यातील एनआयव्ही येथे 43 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र राज्यात ‘यूके’तील स्ट्रेनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

या स्ट्रेनचा संसर्गाचा वेग 70 पटीने अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close